Australia Win Final : लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन वाघिणींची ऐतिहासिक गर्जना! इंग्लंडला लोळवून सातव्यांदा उंचावला टी-२० विश्वचषक
Australia Win Final : ऑस्ट्रेलियाने तब्बल सातव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. त्याचबरोबर अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम ठेवला, तर दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचे इंग्लंडचे स्वप्न धुळीस मिळवले.

Australia Win Final after beat England Women T20 World Cup 2026 Final : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रंगतदार झालेल्या जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने बलाढ्य यजमान इंग्लंडचा ७ गडी राखून दारुण पराभव केला. यासह तब्बल सातव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम ठेवला, तर दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचे इंग्लंडचे स्वप्न धुळीस मिळवले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १५० धावा केल्या होत्या, मात्र ऑस्ट्रेलियन वाघिणींनी हे लक्ष्य अवघ्या १७.२ षटकांत ३ गडी गमावून सहज गाठले.
बेथ मूनी आणि फिबी लिचफिल्डची शतकीय भागीदारी –
१५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची स्टार विकेटकीपर-फलंदाज बेथ मूनी दमदार फलंदाजी केली. तिने ४९ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ६४ धावांची मॅच-विनिंग खेळी साकारली. तिला युवा फलंदाज फिबी लिचफिल्ड (४८ धावा) हिने शानदार साथ दिली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची ऐतिहासिक भागीदारी केली. महिला टी-२० विश्वचषक फायनलच्या इतिहासातील ही केवळ तिसरी शतकीय भागीदारी ठरली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये विंडीजच्या हेली मॅथ्यूज आणि सारा टेलर यांनी सर्वाधिक १२० धावांची भागीदारी रचली होती. तत्पूर्वी, इंग्लंडकडून कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट हिने शानदार अर्धशतक झळकावले होते.
THE 14TH TIME CHAMPIONS – AUSTRALIA. 🇦🇺pic.twitter.com/IiQy54vkiM
— Maina Singh (@Maina_Singhx77) July 5, 2026
सोफी मोलिन्यूच्या नेतृत्वात नवा इतिहास; ऑस्ट्रेलियाचे सातवे जेतेपद –
All the emotions from the Women’s #T20WorldCup 2026 champions 🇦🇺😍 pic.twitter.com/eSVNoO0fmo
— ICC (@ICC) July 5, 2026
ऑस्ट्रेलियन संघाने संपूर्ण स्पर्धेत आपली अजेय मालिका कायम राखली. नवनिर्वाचित कर्णधार सोफी मोलिन्यू हिच्या नेतृत्वाखाली खेळताना संघाने एकही सामना गमावला नाही. सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजला नमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडला ७ गडी राखून पराभवाचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी २०१०, २०१२, २०१४, २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये टी-२० विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरले होते.
सर्वाधिक वेळा महिला टी-२० विश्वचषक जिंकणारे देश:
- ऑस्ट्रेलिया: ७ वेळा
- इंग्लंड: १ वेळ
- न्यूझीलंड: १ वेळ
- वेस्ट इंडिज: १ वेळ





