ओैरंगाबाद हादरले! अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून सामुहिक बलात्कार
Updated On:

औरंगाबाद – महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीवर पाच पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाने वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीला आल्याने खळबळ माजली आहे. एका आरोपीने कन्नड तालुक्यातील रहिवासी असलेल्या मुलीवर शुक्रवारी गावातील एका शेतात बलात्कार केला, त्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
शनिवारी, मुलीच्या पालकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर त्यांनी या प्रकरणात सामिल असलेल्या 19 ते 33 वयोगटातील पाच पुरुषांना अटक केली आणि त्याच दिवशी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.अल्पवयीन मुलाला सुधारगृहात पाठवण्यात आले असून अन्य आरोपींना पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकारात अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार केल्याची बाब समोर आली आहे.





