भरधाव कारचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे सात जण बचावले
Updated On:

औरंगाबाद – औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेडा गावाजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. मात्र, एअरबॅगमुळे दोन्ही कारमधील सात जणांचे प्राण वाचले आहेत. ही घटना बुधवारी घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड येथून औरंगाबादला जात असलेली व औरंगाबादहून सिल्लोडकडे येत असलेली कार यांच्यात रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक झाली.
यावेळी कारच्या एअर बॅग उघडल्यामुळे दोन्ही कारमधील सात जण बचावले. एका कारचा चालक बाबर अहेमद चाऊस (रा.सातारा परिसर, औरंगाबाद) जखमी झाला आहे. जखमी चालकावर सिल्लोड येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले. जखमींपैकी एका कारमधील तिघे जण औरंगाबाद येथील, तर एका कारमधील जामनेर (जि.जळगाव) येथील प्रवासी आहे.





