कंगनाचं समर्थन करणाऱ्या गोखलेंना अतुल कुलकर्णींचं प्रत्युत्तर ? दोन शब्दांतच विषय संपवला

मुंबई – देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक असल्याचं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री आणि नुकतीचे पद्मश्री पुरस्काराची मानकरी ठरलेल्या कंगना रणावत हिने केलं होतं. त्यावरून देशातील राजकारण ढवळून निघालं. तिच्या या वक्तव्याचे समर्थन मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केल. आता अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी या वादात उडी घेतली आहे. अतुल यांनी गोखलेंना जोरदार चपराक लगावल्याची चर्चा सध्या नेटकरी करत आहे. अतुल कुलकर्णी यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, कंगनाने देशाच्या स्वातंत्रतेबद्दल केलेल्या विधानाचेही त्यांनी समर्थन केलं आहे. त्यामुळे, गोखले सध्या नेटीझन्सच्या निशाण्यावर आहेत. त्यातच अतुल यांच्या ट्विटने नेटीझन्सला पाठबळ मिळालं आहे.
Seniority and Wisdom are two different things. #globalphenomenon
— atul kulkarni (@atul_kulkarni) November 15, 2021
अतुल कुलकर्णी ट्विट करत म्हटलं की, ‘ज्येष्ठता आणि शहाणपणा या दोन भिन्न गोष्टी आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कुणाचाही उल्लेख केला नाही. #globalphenomenon असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. दरम्यान या ट्विटचा रोख विक्रम गोखलेंवरच होता, अस नेटकऱ्यांना वाटतं.
ब्राह्मण महासंघातर्फे रविवारी विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयावर मत व्यक्त केलं.





