‘वा रे वा… हनुमान चालिसा घरात म्हणावी. हा सल्ला फक्त हिंदूंना. अन् तुमच्या इफ्तार दावत..’ – अतुल भातखळकर

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी करत ३ मे पर्यंतचा अल्टीमेट राज्य सरकारला दिलाय. यातच राज्यातले राजकारण धार्मिक मुद्द्यावरुन राजाकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरेकडे मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी इस्लाम जिमखाना परिसरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचासह या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील विरोधी पक्षावर टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेत्यांकडून प्रतिउत्तर दिले जात आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले अतुल भातखळकर
‘वा रे वा… हनुमान चालिसा घरात म्हणावी. आपल्या धार्मिक श्रद्धेचे जाहीर प्रदर्शन करु नये हा सल्ला फक्त हिंदूंना. आणि तुमच्या इफ्तार दावतचे जाहीर प्रदर्शन होय.’
वा रे वा…
हनुमान चालिसा घरात म्हणावी.
आपल्या धार्मिक श्रद्धेचे जाहीर प्रदर्शन करु नये हा सल्ला फक्त हिंदूंना.
आणि तुमच्या इफ्तार दावतचे जाहीर प्रदर्शन होय. https://t.co/hsekIfP8RP— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 27, 2022





