Pune News : पूर्व हवेलीतील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लक्षवेधी; आमदार पवार, कुल, कंद यांचा पाठपुरावा उल्लेखनीय

वाघोली (प्रतिनिधी) : गेल्या पाच वर्षांमध्ये वाघोलीतील अंतर्गत रस्ते, सांडपाणी, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले आहेत. या लक्षवेधीनुसार मंत्री स्तरावर तसेच आयुक्त स्तरावर अनेक निवेदन देऊन प्रश्नांचा पाठपुरावा केला आहे.
वाघोली साठी आमदार अशोक पवार यांच्याकडून विधानसभेत मांडल्या गेलेल्या लक्षवेधी सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय दौंडचे आमदार राहुल कुल यांनी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप कंद, रामभाऊ दाभाडे, संदीप सातव, शांताराम कटके यांच्या उपस्थितीत अनेक बैठका घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
वाघोली गावातील बुजवलेले ओढणारे मोकळे करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी विधानसभेत आमदार पवार यांनी प्रश्न मांडला असता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आयुक्त स्तरावर कालबद्ध कार्यक्रम आखून हा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
याशिवाय कोरेगाव मूळ बिवरी दरम्यान मुळा मुठा नदीवर पूल व्हावा यासाठी देखील आमदार अशोक पवार यांनी लक्ष वेधले होते सदर कामाला 32 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली आहे.
दौंड चे आमदार राहुल कुल यांनी देखील या प्रश्न राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या पुलाला लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी मागणी केली होती. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांनी देखील या पुलासाठी पाठपुरावा केला होता.
पुणे नगर रोड, पुणे सोलापूर रोड, रस्त्यासारखी वाहतूक समस्या कालांतराने केसनंद गावातील मुख्य चौकात उद्भवू शकते यासाठी या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी आमदार पवार यांनी विधानसभेत केली. विठ्ठलवाडी सांगवी सांडस हा भीमा नदीवरील पूल तात्काळ करण्याची मागणी देखील आमदार पवार यांनी केली आहे.
पुणे महानगरपालिकेत समस्याला 34 गावांच्या प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भातील प्रश्न देखील आमदार पवार यांनी विधानसभेत मांडले आहेत. सोलापूर रस्त्यावरील उरुळी कांचन मधील नर्सरी धारकांचे मोठे नुकसान झाले आहेत. पॉलिहाऊस चे देखील नुकसान झाले आहे.
अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी हा देखील मुद्दा विधानसभेत आमदार पवार यांनी उपस्थित केला. पूर्व हवेलीत प्रदीप कंद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न केले आहे.





