Uday Samant : “विरोधकांकडून माथी भडकवण्यात प्रयत्न” – उदय सामंत

मुंबई – ईव्हीएमविरोधात आंदोलन करून, त्याबाबत वारंवार बोलून विरोधकांकडून लोकांची माथी भडकवण्यात येत असल्याचा आरोप शिंदेसेनेचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे. विधीमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी (ता. 08 डिसेंबर) आमदार उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या ईव्हीएमबाबतच्या आरोपांवर म्हटले की, एकीकडे ईव्हीएमच्या नावावर बोंबाबोंब करायची आणि दुसरीकडे लोकांची माथी भडकवायची हा विरोधकांचा डाव आहे. ही भूमिका महाराष्ट्राला समजली म्हणून ते 40-50 वर आले. नियम लावताना खासदारकीला एक आाणि विधानसभेला एक नियम लावण्याचे काम मविआ करत आहे. इतर ठिकाणी ईव्हीएम चांगले होते आणि आता विधानसभेतील पराभवानंतर ते वाईट आहे, असे म्हणत सामंतांनी मविआवर हल्लाबोल केला.
तसेच, विरोधकांनी आता ईव्हीएमविरोधात वातावरण तयार करण्यापेक्षा जे अपयश ते झाकण्याचा प्रयत्न ईव्हीएमच्या माध्यमातून करत आहेत. विधानसभा निवडणुकीसोबत नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली, तिथे यांचा उमेदवार निवडून आला, तेव्हा ईव्हीएम चांगले आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा विरोधक जेव्हा हारतात तेव्हा त्यांना ईव्हीएम हॅक केले असे वाटते, असे मत मांडले आहे.
त्यामुळे कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ईव्हीएम विरोधात विरोधक आता खापर फोडत आहे. प्रियंका गांधी सुद्धा ईव्हीएमच्या मतांवर निवलडून आल्या, तिथे ईव्हीएम कसे चालले. पण आता आपण ईव्हीएममुळे नाकारले गेले असून जनतेने आपल्याला नाकारले नसल्याचे दाखवायलाच मविआ नेते ईव्हीएमविरोधात बोंबाबोंब करत असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.





