Attempted Murder Case : लक्षद्वीपचे माजी खासदार ‘मोहम्मद फैजल’ यांना दिलासा; “केरळ उच्च न्यायालयाने…”

कोची – केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी लक्षद्वीपचे माजी खासदार मोहम्मद फैजल यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असणाऱ्या फैजल यांना मोठाच दिलासा मिळाला.
फैजल यांना काही दिवसांपूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. त्यांना दहा वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यापाठोपाठ खासदार म्हणून त्यांना अपात्र ठरवण्यात आले. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत फैजल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
उच्च न्यायालयाने दोषी ठरवण्याला स्थगिती दिल्याने फैजल यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्याचा निर्णय रद्दबातल ठरू शकतो. लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक याआधीच जाहीर करण्यात आली आहे. त्या पोटनिवडणुकीवरही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/government-flag-hoisting-will-be-held-at-9-15-am-across-the-state-on-republic-day-the-etiquette-department-made-it-clear-through-a-circular/
फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल. त्यामुळे सरकारी तिजोरीवर आणि जनतेवर आर्थिक भार पडेल, असे न्यायालयाने निकाल देताना नमूद केले. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी आता पंधरा महिन्यांचाच अवधी शिल्लक असल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.





