Sambhaji Chhatrapati : पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा पराक्रम पुसण्याचा प्रयत्न? संभाजीराजे संतापले; थेट केंद्र सरकारला पत्र
Sambhaji Chhatrapati : मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करावा, छत्रपती संभाजीराजे यांचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र

Sambhaji Chhatrapati : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात वादाचे वादळ निर्माण झाले आहे. छत्रपती घराण्याने यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
NCERT ने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा काढून टाकला आहे. या निर्णयामुळे शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
यानंतर आता NCERT ने पाठ्यपुस्तकातून हटविलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करावा यासाठी छत्रपती संभाजीराजे यांचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले आहे. Sambhaji Chhatrapati
NCERT ने पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस कारण न देता वगळला आहे. ही मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाची व राष्ट्र रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची प्रतारणा आहे.
मराठ्यांचे प्रभुत्व संपूर्ण देशावर होते, याबाबतच्या समकालीन पुराव्यांसह इतिहासकरांनी भाष्य केलेले… pic.twitter.com/23XdEb6ZUr
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) April 13, 2026
‘मराठा साम्राज्याचा नकाशा पुनःश्च पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा’ (Sambhaji Chhatrapati )
NCERT ने पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस कारण न देता वगळला आहे. ही मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाची व राष्ट्र रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची प्रतारणा आहे. मराठ्यांचे प्रभुत्व संपूर्ण देशावर होते, याबाबतच्या समकालीन पुराव्यांसह इतिहासकरांनी भाष्य केलेले आहे.
मराठा साम्राज्याचा इतिहास व राष्ट्राच्या जडणघडणी मध्ये त्यांचे असलेले योगदान भावी पिढीस ज्ञात व्हावे, याकरिता मराठा साम्राज्याचा नकाशा पुनःश्च पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, या मागणीचे सविस्तर पत्र केंद्रीय शिक्षण मंत्री यांस पाठविले आहे.
छत्रपती वृषालीराजे भोसलेही आक्रमक (Sambhaji Chhatrapati )
याआधी छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नसून आमचा स्वाभिमान आहे. राजस्थानमधील विजयाची वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे आहे. कोणत्याही दबावाखाली इतिहास बदलला जाऊ नये,” असे त्यांनी स्पष्ट केले होते.
कोणाला वाटले म्हणून इतिहास पुसला जात नाही किंवा बदलला जात नाही. कुणाच्या दबावाने हा नकाशा गायब करण्यात आला असा सवाल छत्रपती घराण्यातील वृषालीराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा:





