पेपरफुटी प्रकरणाचा तपास करण्यास गेलेल्या सीबीआयच्या टीमवर हल्ला; नेमकं काय घडलं?

CBI Team Attacked| यूजीसी नीट आणि नेट पेपर लीक प्रकरणात दिवसेंदिवस नवेनवे खुलासे होत आहेत. परीक्षांमधील कथित अनियमिततेचा तपास सीबीआय करत आहे. याच प्रकरणी यूनियन ग्रँट कमिशन- नॅशनल इलिजिबिलीटी टेस्ट (UGC NET) पेपरफुटी प्रकरणी बिहारच्या नवाडा जिल्ह्यात गेलेल्या सीबीआयच्या टीमवर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
दरम्यान, सीबीआयची टीम मुरहेना-कसियाडीह भागात पेपर लीक प्रकरणाचा तपास करण्यासाठी आली होती. यावेळी स्थानिकांनी खोटे पोलीस असल्याचं समजून सीबीआय टीमवर हल्ला केला, शिवाय टीमचे वाहनांचे देखील नुकसान केले. गावकऱ्यांच्या हल्ल्यात सीबीआयच्या दोन वाहनांचं नुकसान झालं आहे, तर काही जण जखमी झाले आहेत.
ग्रामस्थांच्या हल्ल्यातून वाचल्यानंतर सीबीआयचे अधिकारी रजौली पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी झालेल्या हल्ल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रजौली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं. यूजीसी पेपर लीक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाच्या सांगण्यावरून कसियाडीहमध्ये एका तरुणीचा शोध घेण्यासाठी सीबीआयची टीम पोहोचली होती. छापेमारीदरम्यान सीबीआयच्या टीमला दोन मोबाईल, काही बँकांची पासबुक आणि यूजीसी नेटसंबंधी काही कागदपत्र मिळाली आहेत. CBI Team Attacked|
नेमकं काय घडलं?
UGC-NET परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. या तपासादरम्यान एका संशयिताचे मोबाइल लोकेशन बिहारच्या नवादा जिल्ह्यातील कसियाडीह गावातील दाखवण्यात आल्याने सीबीआयचे पथ तेथे पोहोचले. या तपास पथकात चार अधिकारी आणि महिला शिपाई होते. मात्र, काही गावकऱ्यांनी तोतया पोलीस असल्याचा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावकरी जमा झाले आणि त्यांनी सीबीआय पथकातील अधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच वाहनांची तोडफोड केली. यामुळे तेथे एकच गोंधळ निर्माण झाला होता.
हेही वाचा:
”…तर मी गावचा सरपंच होईन ” ; रावसाहेब दानवे असं नेमकं का म्हणाले ? वाचा





