Laxman Hake’s car attacked : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी ते आले होते. ते अहिल्यानगरच्या दिशेने रवाना झाले, मात्र त्यापूर्वी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही. पण मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरजवळ असलेल्या आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरुणांनी हल्ला केला. आज पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. दुपारी दोन वाजता त्यांची सभा होणार आहे. यामुळे ही सभा होणार की नाही याबाबत माहिती समजू शकलेली नाही. नेमकी घटना कशी घडली? पुण्याहून लक्ष्मण हाके सभेसाठी पाथर्डी येथे चालले होते. तेव्हाच मध्येच रस्त्यावर हल्ला झाल्याच त्यांच्या सहकाऱ्याने सांगितले. हल्ला करणारे कोण होते याची माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. ओबीसी समाज्याच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काल त्यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर आज त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात गाडीचे नुकसान झाले आहे. यामुळे या हल्ल्यामागे कोण आहे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा : पाहणी दौऱ्यासाठी पोहचले अन् माघारी फिरले! सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी घातला गराडा; नेमकं काय घडलं?