पुणे | आटा, रव्यासह मैद्याचे दर वाढले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : आवक वाढल्यामुळे मूगडाळीच्या भावात क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांनी घट झाली. हरभराडाळ, तुरडाळीलाही उठाव कमी असल्याने दर मंदीकडे झुकले आहेत.
गोटा खोबरे आणि खोबरेल तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले. मात्र, मिलबर गहू, आटा, रवा आणि मैद्याच्या दरात आणखी वाढ झाली आहे. आगामी दिवाळी सणामुळे रवा मैदा, सुजी या जिनसांना मागणी वाढली आहे.
मात्र, उत्पादकांना अन्न महामंडळाकडून मिलबर गव्हाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे हलक्या प्रतीच्या गव्हाच्या दरात क्विंटलमागे आणखी शंभर रुपयांनी वाढ झाली.
गव्हाच्या दरवाढीमुळे आटा, रवा, तसेच मैद्याच्या दरात ५० किलोंच्या पोत्यामागे आणखी पन्नास रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, आवक- जावक साधारण असल्यामुळे ज्वारी, बाजरी, तसेच तांदळाच्या दरात कोणताही बदल आढळला नाही.
मुगाची आवक वाढल्याने मूगडाळीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात दरात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी घट झाली. मागणी कमी असल्यामुळे हरभराडाळ, तसेच तूरडाळीच्या दरातही क्विंटलमागे आणखी दोनशे रुपयांनी घट झाली.
मात्र, आवक जावक साधारण असल्यामुळे अन्य डाळी, तसेच कडधान्यांचे दर स्थिर होते. गेल्या आठवड्यात साखरेस मागणी कमी असल्याने दर स्थिर होते.
त्याचबरोबर गुळाचे दरही स्थिर होते. लवकरच उत्तर प्रदेशातील गुऱ्हाळे सुरू होणार असून, तेथील गुळाची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुळाची दरवाढ थांबली आहे. दरम्यान, खाद्यतेले तेजीतच असून, खोबरेल तेल दरात किंचित घट झाली आहे.
आयात शुल्कवाढीचा खाद्यतेलांस फटका बसला असून, अद्यापही दरवाढ सुरूच आहे. परतीच्या पावसाने खरीपातील तेलबियांचे नुकसान झाले असून,
यामुळे उत्पादन कमी होण्याबरोबरच हंगामही लांबणार आहे. सणासुदीचा कालावधी असल्यामुळे खाद्यतेलांस मागणी चांगली असल्याने दरवाढीस चालना मिळत आहे.
गेल्या आठवड्यातही शेंगदाणातेल, सोयाबीन, पाम, तसेच सरकी तेलाच्या दरात १५ किलो/लिटरच्या डब्यामागे आणखी पन्नास रुपयांनी वाढ झाली.
वनस्पती तूप उत्पादनासाठी लागणाऱ्या खाद्यतेलांचे दर कडाडल्याने वनस्पती तुपाचे दरही डब्यामागे आणखी शंभर रुपयांनी वाढले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत खोबरेल तेलाचे दर १५ किलोच्या डब्यामागे शंभर ते दीडशे रुपयांनी कमी झाले आहेत.
बाजारातील दर पुढीलप्रमाणे –
साखर (प्रतिक्विंटल) ३८८०-३९२५ रु.
खाद्यतेले (१५ किलो/लिटर):- शेंगदाणा तेल २५७५-२६२५, रिफाइंड तेल २३२५-२६००, सरकी तेल १९८०-२३००, सोयाबीन तेल १९५०-२१५०, पामतेल १९००-२१००, सूर्यफूल रिफाइंड तेल १९५०-२१००, वनस्पती तूप २०००-२४००, खोबरेल तेल ३३००-३४०० रु.
तांदूळ :- गुजरात उकडा ३५००-४०००, मसुरी ३५००-४०००, सोना मसुरी ४५००-५०००, एचएमटी कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, ११२१-११०००-११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ७०००-८०००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार ९५००-१००००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, १५०९- ८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रु.
गहू – सौराष्ट्र लोकवन नं. १ ४३००-४५००, सौराष्ट्र लोकवन नं. २ – ३८००-४०००, एमपी लोकवन नं. १ – ४२००-४४००, नं. २ – ३७००-४०००, नं. ३ – ३३००-३५००, सिहोर ५६००-६०००, सिहोरी ४३००-४३००, मिलबर ३२००-३२५० रु.
ज्वारी :- गावरान नं. १ ५१००-५४००, गावरान नं. २ ४०००-४४००, नं.३ ३३००-३४००, दुरी नं. १ – ३२००-३३००, दूरी नं. २- ३०००-३१०० रु.
बाजरी :- महिको ३४००-३८००, गावरान ३२००-३४००, हायब्रीड २८००-३१०० रु.
गूळ:- गूळ एक्स्ट्रा ४३००-४४५०, गूळ नं. १- ४०००-४२५०, गूळ नं. २- ३९२५-४०५० गूळ नं. ३- ३८००- ३८७५, बॉक्स पॅकिंग ३९००-५२०० रु.
डाळी:- तूरडाळ १३०००-१६०००, हरभराडाळ ९२००-९३००, मूगडाळ १०२००-१०५००, मसूरडाळ ७३००-७४००, मटकीडाळ १००००-१०१००, उडीदडाळ ११०००- १२५०० रु.
कडधान्ये:- हरभरा ८४००-८५००, हुलगा- ७५००-७७०० चवळी ९०००-११००, मसूर ६८००-६९००, मूग ८५००-९५००, मटकी गावरान ७५००-८५००, मटकी पॉलिश ७५००-८०००, मटकी गुजरात ७५००- ८०००, मटकी राजस्थान ७५००-८०००, मटकी सेलम ९८००-१००००, वाटाणा हिरवा १५०००-१८०००, वाटाणा पांढरा ४५००-४६००, काबुली चणा १५०००-१७००० रु.
साबुदाणा :– साबुदाणा नं. १- ६५००, साबुदाणा नं. २- ६०००, साबुदाणा नं. ३- ५८०० रु.
वरई भगर :- १०५००, सावा भगर १०००, गोटा खोबरे १९०-२१० रु.
शेंगदाणा :- जाडा १००००, स्पॅनिश – ११०००-११५०० घुंगरू १०३००-१०५०० रु.
धने :- गावरान ९०००-१००००, इंदूर १२०००-१५००० रु.
पोहे :- मध्य प्रदेश ४६००-४८००, पेण ४५००-४६००, मध्यम पोहा ४४००-४६००, दगडी पोहा ४४००- ४८००, पातळ पोहा ५१००-५७००, सुपर पोहा ४९००-५४००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ६७५-७७५, भाजके डाळे ४२००-४८००, मुरमुरा सुरती (९ किलोस) ५७०, भडंग ८५०-१०००, घोटी ५३०, सुरती ५७० रु.
रवा, मैदा, आटा – (५० किलोचा भाव) आटा १७५०-१८५०, रवा १८५०-१९००, मैदा १८५०-१९००,
बेसन :- (५० किलोस) ५२००-५५०० रु.
मीठ :- मीठ खडे (५० किलोस) २२५, मीठ दळलेले (५० किलोस) २५० रु.
मिरची:- काश्मिरी ढब्बी ३५०००-३८०००, ब्याडगी २००००-२३०००, लवंगी तेजा २००००-२२०००, गुंटूर १८०००-२००००, खुडवा गंटूर ८०००-९०००, खुडवा ब्याडगी ९०००-१०००० रु.
नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग २१००-२३००, मद्रास ३५००-३७००, पालकोल जुना २३००-२४००, सापसोल ३३००-३५०० रु.





