आतिशी यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, बेमुदत उपोषणादरम्यान ढासळली होती प्रकृती

Delhi Minister Atishi discharged form Hospital| दिल्ली सरकारच्या मंत्री आणि आप नेते आतिशी यांना आज गुरुवारी 27 जून 2024 रोजी दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीतील पाणीटंचाईवर बेमुदत उपोषणाला बसलेल्या जलमंत्री अतिशी यांची प्रकृती बिघडल्याने 25 जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर प्रकृतीत सुधारणा होत असल्याने गुरुवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आतिशी आज व्हीलचेअरवर बसून हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसल्या. दरम्यान, त्यांची शुगर लेव्हल बरीच कमी झाली होती. यानंतर त्वरित त्यांना दाखल करण्यात आले होते. जलमंत्री आतिशी हे गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषणावर होत्या. हरियाणा दिल्लीच्या वाट्याचे पाणी देत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
#WATCH | Delhi Minister Atishi discharged from Lok Nayak Hospital.
She was brought here on the late night of June 25 after her health deteriorated during her indefinite hunger strike over Delhi water crisis and supply of water from Haryana. pic.twitter.com/UDsj3LJwfy
— ANI (@ANI) June 27, 2024
अखिलेश यादव यांनी घेतली अतिशी यांची भेट
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी मंत्री आतिशी यांची लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दिल्लीत पाणीटंचाई कायम असल्याचे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. दिल्लीतील 28 लाख लोकांना पाणी मिळत नाही. शक्य ते सर्व प्रयत्न करूनही हरियाणा सरकार दिल्लीला पूर्ण पाणी देत नाही. यासाठी आतिशी यांनी 21 जून रोजी भोगल, जंगपुरा येथे उपोषण सुरू केले होते. मात्र उपोषणादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांच्या बेमुदत उपोषणाला पूर्णविराम मिळाला. Delhi Minister Atishi discharged form Hospital|
हेही वाचा:
भाजप नेत्याच्या पत्नीवर हिप्नोटिज्मचा प्रयोग? तब्बल २० लाखांची फसवणूक; नेमकं काय आहे प्रकरण ‘वाचा’





