आतिशी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान संथपणे होत असलेल्या मतदानाबाबत केला मोठा आरोप; म्हणाल्या…

Delhi Lok Sabha Election 2024| देशातील लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज मतदान पार पडत आहे. दिल्लीतील सातही लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. सकाळपासूनच लोक मतदान करत आहेत. यासोबतच पक्षाचे नेतेही आपापल्या मतदानस्थळी पोहोचून मतदान करत आहेत.
आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनीही मतदान केले. मात्र दिल्लीतील काही भागात संथपणे मतदान पार पडत आहे. यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. यावरून आपच्या नेत्या आतिशी दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आतिशी यांचा दिल्लीच्या एलजींवर गंभीर आरोप
आतिशी यांनी ट्वीटद्वारे दावा केला, “आज दिल्लीच्या एलजीने दिल्ली पोलिसांना आदेश दिले आहेत की ज्या भागात भारत आघाडीचे मतदार मोठ्या संख्येने आहेत त्या भागात मतदान संथपणे करावे , जेणेकरून लोकांना त्यांचे मतदान करण्यात अडचण येईल. ”
पुढे अतिशी यांनी म्हंटले की, “भाजपला विजय मिळवून देण्याचा प्रशासनाचा असा कोणताही प्रयत्न बेकायदेशीर, गैर-लोकशाही आणि असंवैधानिक आहे. मला आशा आहे की निवडणूक आयोग त्याची दखल घेईल. असे कोणतेही प्रयत्न रोखले जाईल.” Delhi Lok Sabha Election 2024|
ऐसी जानकारी मिली है कि आज @LtGovDelhi ने दिल्ली पुलिस को आदेश दिए हैं कि जहां INDIA गठबंधन के वोटर भारी संख्या में हैं, वहाँ पर वोटिंग धीरे करवानी है ताकि लोगों को वोट डालने में दिक़्क़त हो।
प्रशासन द्वारा भाजपा को जिताने का ऐसा कोई भी प्रयास ग़ैर-क़ानूनी, ग़ैर-लोकतांत्रिक और…
— Atishi (@AtishiAAP) May 24, 2024
आतिशी यांची ही पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरळीत मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाला आवाहन केले. ते म्हणाले, “हे धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीत सुरळीत मतदान व्हावे याची काळजी घ्यावी.” यावर एलजी व्हीके सक्सेना यांनी प्रतिक्रिया देत आतिशीच यांचे दावे फेटाळून लावले आहेत. Delhi Lok Sabha Election 2024|
“केजरिवाल साहेब, ज्या स्थितीत आहे, फक्त रडत राहायचे ही तुम्ही सवयच लावली आहे. संवैधानिक अधिकाराच्या विरोधात तुमच्या समर्थन केलेल्या एका मंत्र्याने निवडणुकीपूर्वी केलेल्या या अयोग्य आणि चुकीच्या विधानावर मी कठोर भूमिका घेतली आहे,” असे प्रत्युत्तर दिल्लीच्या एलजींनी दिले आहे.
आदत ही बना ली है आप ने तो ऐ केजरीवाल साहब,
जिस हाल मे रहना, बस रोते हुए रहना!
I have taken a stern view of this unwarranted & false statement on the eve of election against a constitutional authority by a Minister, endorsed by you. https://t.co/7sPWH2HwLG— LG Delhi (@LtGovDelhi) May 24, 2024
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 । बन्सुरी स्वराज यांनी वडिलांसोबत जाऊन मतदान केले




