अॅथलेटिकचा व्हिडीओ बनविणारा कॅमेरामॅनच झाला विजयी; बिग बींनी शेअर केला व्हिडीओ

बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन बॉलिवूडसोबतच सोशल मीडियावरही नेहमीच अॅक्टिव्ह असतात. नुकताच त्यांनी एका अॅथलेटिकचा मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडीओ एका अॅथलेटिक स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण होते. या व्हिडिओमध्ये अॅथलेटिक स्पर्धकांचे कव्हरेज करताना कॅमेरामॅनही त्यांच्यासोबत वेगात पळत होता. परंतु, स्पर्धकांच्या आधीच कॅमेरामॅन शेवटचा पॉईंट क्रॉस करतो आणि विजयी होतो.
camera man ko .. https://t.co/0j2DhgzqSH
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 4, 2019
या व्हिडीओमुळे अमिताभ बच्चनही आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस कोणाला मिळले पाहिजे खेळाडूला की कॅमेरामॅनला? असा प्रश्न त्यांनी कॅप्शनमध्ये विचारला आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांना नुकताच सिनेसृष्टीतील सर्वात मानाचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले आहे.





