Athiya Shetty : ‘बाप आहे की बॉयफ्रेंड?’ सुनील शेट्टींसमोर विचित्र कपडे परिधान केल्याने अथिया ट्रोल

Entertainment : मुंबईत जिओ वर्ल्ड प्लाझाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानिमित्त एक भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बॉलीवूडमधील सलमान खान, कतरिना कैफ, राजकुमार राव, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, करीना कपूर या सारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता सुनील शेट्टी (Rahul Shetty)आणि त्यांची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र यावेळी आथियाने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुनील शेट्टी यांनी निळ्या रंगाचा कोट आणि पँट परिधान केली असताना लोकांच्या नजरा त्यांच्या मुलीच्या पोशाखाकडे खिळल्या. आता सोशल मीडिया यूजर्स अथियाला तिच्या ड्रेसिंगवरून प्रचंड ट्रोल करत आहेत. या कार्यक्रमात अथिया शेट्टी काळ्या रंगाचा ब्रॅलेट आणि पँट सेट घालून कार्यक्रमात पोहोचली होती.
View this post on Instagram
‘वडिलांसमोर असे कपडे घालायला लाज वाटत नाही,’ ‘तुझ्या वडिलांना लाज वाटत आहे, हे स्पष्ट दिसत आहे,’ ‘वडिलांसमोर किमान चांगले कपडे घाला आणि मी विचार करत होतो की सुनील सर इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत पण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सगळे सारखे असतात,’ ‘तो बाप आहे की बॉयफ्रेंड? अशा कपड्यात तुम्हाला लाज वाटत नाही, निर्लज्ज लोकांनो, तुम्ही मर्यादा ओलांडली आहे,’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, आथियाने ‘मोतीचूर चकनाचूर’, ‘मुबारका’ यासारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र बॉलीवूड मध्ये तिला म्हणावे तसे यश मिळालेले नाही.





