अथिया शेट्टी आणि केएल राहुल होणार आई-बाबा

Athiya Shetty Pregnancy | बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी आणि तिचा नवरा भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांनी गुड न्यूज दिली आहे. लवकरच आथिया आणि केएल राहुल आई-बाबा होणार आहे. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अथिया लग्नाच्या दीड वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. अथियाने आपल्या सोशल मिडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
त्यात असे लिहिले आहे की, “आमचे सुंदर आशीर्वाद लवकरच येत आहेत, 2025”. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटरने त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टद्वारे तिने प्रेग्नेंसीची घोषणा करत पुढील वर्षी त्यांच्या बाळाचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल 2019 पासून एकमेकांना ओळखत होते. अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते आणि अखेर 2023मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. आता 2025 हे जोडप आई-बाबा होणार आहे. अलीकडेच दीपिका पदुकोण-रणवीर सिंह, रिचा चढ्ढा-अली फजल यांसह अनेक सेलिब्रिटी कपल्सने आपल्या बाळाचे स्वागत केले. आता लवकरच अथिया आणि केएल राहुल यांच्या घरी देखील बाळाचे आगमन होणार आहे.
हेही वाचा:
झारखंड निवडणुकीपूर्वी आयकर विभागाची कारवाई ; हेमंत सोरेन यांच्या वैयक्तिक सल्लागाराच्या घरावर छापा





