Amitabh Bachchan : “या वयात मी तर…”; 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीचे बिग बींकडून कौतुक
Amitabh Bachchan : लहान वयात वैभवने क्रिकेट विश्वात मोठे नाव कमावले

Amitabh Bachchan: आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या दारुण पराभवासोबतच राजस्थानचे पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.
या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने ९६ धावांची अप्रतिम खेळी केली होती, परंतु तरीही गोलंदाजांच्या अपयशामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
जरी राजस्थान रॉयल्स हा संघ फायनलपर्यंत नाही पोहोचला तरीही वैभवने मात्र त्याच्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. इतक्या लहान वयात वैभवने क्रिकेट विश्वात मोठे नाव कमावले आहे. त्याची या कामगिरीचे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी आता एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “सूर्यवंशी– १५ वर्षांचा अद्भूत सूर्या. या वयात तर मी विटी दांडूसुद्धा नीट खेळत नव्हतो.”
T 5756(i) –
Sooryavanshi – १५ साल की उम्र का अद्भुत सूर्या ।
इस उम्र में तो हम बंटों और गुल्ली डंडा भी ठीक से नहीं खेल पा रहे थे !!— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 29, 2026
फक्त अमिताभ बच्चन यांनीच नाही तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही वैभवच्या खेळाचे कौतुक केले आहे. सध्या सोशल मीडियावर वैभववर जोरदार कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने यंदाच्या आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडत अनेक विक्रम मोडले आहेत. तो आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून १६ सामन्यांत ७७६ धावांसह ‘ऑरेंज कॅप’ सध्या त्याच्याकडेच सुरक्षित आहे.
पराभवानंतर वैभव सूर्यवंशी मैदानामध्ये भावूक
दरम्यान, शुक्रवारी राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्सच्या क्वालिफायर २ सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीच्या राजस्थान रॉयल्स संघाला पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करूनही त्यांचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. पराभवानंतर वैभव सूर्यवंशी मैदानामध्ये भावूक झाला होता. टीममधील अनेक क्रिकेटपटूंनी वैभवला धीर देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा:
Devendra Fadnavis : जरांगेंनी एका दिवसात उपोषण मागे घेतलं; आता CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर





