केडगाव बायपास चौकात गोवंशीय जनावरांचा टेम्पो पकडला
Updated On:

नगर – केडगाव बायपास चौक येथे कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो कोतवाली पोलिसांनी पकडला. यात २७ जीवंत गोवंशीय वासरे पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी शिवाजी काशिनाथ कुरेशी यांनी तक्रार दिली आहे. वाहीद इक्बाल कुरेशी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. आरोपी यांने त्यांच्या ताब्यातील जनावरे टेम्पोत दाटीवाटीने बांधून घेऊत जात होता. तसेच या जनावरांना चारा पाण्याची वयवस्था न करता कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.





