“विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेसोबत जाणार”; प्रकाश आंबेडकरांचे मोठं विधान

Prakash Ambedkar | विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळीच्या प्रचारसभांनी जोर धरला आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुक निकालानंतर आम्ही सत्तेसोबत जाणार असल्याचे मोठे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले आहे. अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. Prakash Ambedkar |
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन असून सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं.” याद्वारे त्यांनी राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. Prakash Ambedkar |
तर ‘बटेंगे तो कटेंगे”च्या मुद्द्यावरही आंबेडकरांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. विकासाचे मुद्देच नसल्यामुळे भाजप मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. माध्यमं जाणीवपूर्वक वंचितकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही आंबेडकरांनी यावेळी केला.
मात्र ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तेत जाण्याच्या विधानानंतर आता प्रकाश आंबेडकर आगामी काळात काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. Prakash Ambedkar |
हेही वाचा:
“हिंदू- मुस्लिमांमधील वातावरण…” ; ‘व्होट जिहाद’वरून शरद पवारांनी फडणवीसांना सुनावले खडेबोल




