Maharashtra Assembly Elections 2024 : नेवाशात होणार तिरंगी लढत, मुरकुटे-गडाख-लंघेसह 12 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात….

नेवासा प्रतिनिधी – स्वतंञ नेवासा विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारांची मोठी जञाच भरलेली असून प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शंकरराव गडाख आणि महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे या दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या विरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी निवडणुक आखाड्यात शड्डू ठोकल्यामुळे आ. गडाखांच्या कार्यकर्त्यांतून आपला नेताच आता फिक्स आमदार होणार असल्याची भविष्यवाणी सध्या व्यक्त केली जात आहे तर विठ्ठलराव लंघे यांचा गेल्या दोन वेळा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आलेल्या संधीचे सोने करुन पुन्हा एकदा विठ्ठलराव लंघे- पाटील यांना आमदार म्हणून पाहण्यासाठी लंघे समर्थक आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते विठ्ठलराव लंघे यांच्या विजयासाठी निवडणुकीच्या रणांगणात झुंज देण्यासाठी सक्रिय झालेले आहेत.
तर दुसरीकडे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे समर्थक ऐनवेळी पक्षाने केलेल्या गद्दारीला धडा शिकविण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात विचिञ कौल देणारा मतदार संघ म्हणून ओळख असणारा मतदार ‘राजा’ या निवडणुकीत नेमका कोणाला कौल देणार? आणि कोणाला धडा शिकविणार? याबाबत सध्या सोशल मीडियातून नेटकरी चांगलेच पेटलेले दिसून येत आहेत.
सोमवार (दि.4) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी प्रमुख तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे चिञ स्पष्ट झाल्यामुळे आ.गडाख – लंघे आणि मुरकुटे असा नेवाशात तिरंगी सामना रंगणार आहे. शेवटच्या दिवशी इतरही काही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतलेले नसल्यामुळे नेवासा मतदार संघात निवडणुकीच्या आखाड्यात अनेक जण “बेगाने शादी में अब्दुला दिवाना” झाल्याचे चिञ दिसत असून एकुण बारा उमेदवार नेवाशात निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन उमेदवारांत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी टिकाटिप्पणी ही आता महायुतीचे लंघे – पाटील आणि मुरकुटे यांच्यातच रंगण्याची चिन्हे निर्माण झाल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आ.गडाख सध्या राजकीय रणांगणात सुसाट असल्याचे प्रथम दर्शनिय दिसून येत असून जनता – जनार्धन लंघे – मुरकुटे यांच्यापैकी सुज्ञ मतदार नेमके कोणाला स्विकारणार? आणि कोणाला पसंती देणार? हाच खरा सवाल रणांगणातून सध्या चांगलाच चर्चीला जात आहे.
“माझ्यावर लोकांचा विश्वास, बदनामीच्या राजकारणाला…”; रोहित पाटलांचे संजयकाका पाटलांना प्रत्युत्तर
महायुतीकडून लंघे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आता दोन वेळेस झालेल्या पराभवाचे शल़्य काढण्यासाठी लंघे समर्थक पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे दिसून येत असतांना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना शेवटच्या क्षणी ऐनवेळी तिकीट न दिल्याचा आरोप करुन मुरकुटेंनी प्रहारकडून उमेदवारी घेतल्यामुळे या निवडणूकीत महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा लंघे – मुरकुटे यांच्यातच टिकेचा भडिमार होण्याची चिन्हे सुकृतदर्शनिय होतांना दिसून येत आहे.
महाविकास आघाडी उबाठा सेनेचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या विरोधात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे – पाटील यांना उमेदवारी मिळालेली असतांनाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अब्दूल शेख यांना पक्षाचा ए.बी.फॉर्म आल्यामुळे शेख यांनी उमेदवारी दाखल केलेली माञ शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी माघारी घेवून लंघे यांच्या प्रचारात ते सामिल होणार आहेत.





