Assembly elections 2023 : निवडणूक आयोगाचा आजपासून तीन दिवसीय मिझोराम दौरा
Updated On:

नवी दिल्ली :- पुढील काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग मंगळवारपासून(दि.२९) मिझोरामला भेट देणार आहे. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा असेल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत राजधानी आयझॉलमध्ये असतील, तेथे ते राज्यातील अधिकाऱ्यांशी निवडणूक तयारीबाबत चर्चा करणार आहेत.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम आणि राजस्थानमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. आयोगाने गेल्या आठवड्यात छत्तीसगडचा दौरा करून तेथील निवडणूक तयारीची माहिती घेतली होती.
मिझोरमच्या विधानसभेचा कार्यकाळ या वर्षी डिसेंबर रोजी संपत आहे. या राज्यात मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता आहे.





