विधानसभा एकत्र, पण महापालिका स्वतंत्र लढणार; अजित पवारांची मोठी घोषणा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडत असून पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली. यावेळी, लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी म्हंटले. त्यामुळे, महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं स्पष्ट झालं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचे दिसत आहे.
सुप्रिया सुळेंवर पलटवार
2004 पासून मी पालकमंत्री म्हणून काम केलं, आरोप प्रत्यारोपला मी उत्तर देत नाही. मावळात पैसे गेले मावळात पैसे गेले अस बोललं जात होतं,आधी बारामती शिरूरला निधी दिला त्यावर कोणी बोलत नाहीत. सगळ्यां आमदार खासदारांना मी बोलू दिलं,कारण नसताना नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, असे म्हणत डीपीडीसीच्या बैठकीतील खासदार सुप्रिया सुळेंच्या आरोपावर अजित पवारांनी पलटवार केला.
जाती-जातीत सलोखा राहिला पाहिजे
विशाळगड येथे जे घडू नये ते घडलं,कोर्टाने आदेश दिले,त्यांना आता मदत केली.सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, जाती जातीमध्ये सलोखा राहिला पाहिजे, सर्वजण गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे असे अजित पवार यावेळी म्हणाले.





