राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आज महाफैसला; कोणाची सत्ता येणार?

Maharashtra Assembly Election 2024 | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज्यात महायुतीचे पुन्हा एकदा सरकार स्थापन होणार की महाविकास आघाडी बाजी मारणार याचा शनिवार 23 नोव्हेंबर रोजी महाफैसला होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले. त्यानंतर शनिवार आठ वाजता एकाचवेळी मतांची मोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे.
या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षाने आपापल्या आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी खास व्यवस्था देखील केली आहे. जवळपास ३० वर्षानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ६६ टक्के मतदान झाले आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पाच टक्के जास्त मतदान झाले आहे. मतटक्का वाढल्याने याचा फायदा नेमका कोणाला होणार याविषयी उत्सुकता आहे. त्यामुळे राज्यात नेमकी कोणाची सत्ता स्थापन होणार आणि त्यांची पुढील रणनीती काय ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तुम्ही अचूक निकाल पाहू शकता –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांसाठी, निवडणूक आयोगाकडून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी 8 ते 8.30 वाजेपर्यंत टपाली मतपत्रिकांची तर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8.30 वाजता सुरू होईल. निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही निकाल पाहू शकता.
हेही वाचा:
Cooch Behar Trophy 2024 : सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, 51 चौकारासह झळकावलं दिमाखदार द्विशतक…





