‘दिब्रुगड’ बनणार आसामची दुसरी राजधानी ; देशातील ‘या’ राज्यांनाही आहेत दोन राजधान्या, वाचा कोणत्या राज्यांचा आहे समावेश?

Assam Second Capital । भारतातील सर्व राज्यांना त्यांची स्वतःची राजधानी आहे, जिथून संपूर्ण राज्याचे काम चालते आणि लोकांसाठी धोरणे बनवली जातात. तसेच अशी काही राज्ये आहेत जिथे एक नाही तर दोन राजधान्या आहेत. आता या यादीत आसामचे नावही जोडले जाणार आहे. कारण आसामलादेखील दुसरी राजधानी मिळाली आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती Assam Second Capital ।
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत घोषणा केली आहे. याविषयी माहिती देताना हिमंत बिस्वा यांनी,”आता दिब्रुगडलाही आसामची राजधानी बनवले जाणार आहे. सध्या दिसपूर ही आसामची राजधानी आहे. त्यानंतर, येत्या काही महिन्यांत ‘दिब्रुगड’ ही दुसरी राजधानी म्हणून विकसित केली जाणार आहे.असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशात आसाम एकच देश नाही ज्याला दोन राजधानी असणार आहेत . तर या अगोदर देखील देशातील इतर राज्यांना दोन राजधान्या मिळाल्या आहेत.
‘या’ राज्यांना आहेत दोन राजधान्या Assam Second Capital ।
आसामपूर्वी, देशातील अनेक राज्यांनी दोन राजधान्या निर्माण केल्या आहेत. सहसा राज्य सरकारे असे करतात कारण त्यांना त्या विशिष्ट ठिकाणाचा किंवा जिल्ह्याचाही विकास करायचा असतो. राजधानी झाल्यानंतर, त्या ठिकाणी अनेक प्रकारची कामे सुरू होतात आणि लोकांना त्याचा फायदाही मिळतो.
हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेशलाही दोन राजधान्या आहेत, हिमाचलची राजधानी ‘शिमला’ आहे. पण ‘धर्मशाळा’ हिवाळी राजधानी बनवण्यात आली आहे. याचा अर्थ या डोंगराळ राज्याला दोन राजधान्या देखील आहेत. दोन राजधान्या निर्माण करण्याचे कारण म्हणजे हिवाळ्यात शिमला येथे प्रचंड बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे रस्ते देखील बंद होतात. म्हणूनच या काळात धर्मशाळेला राजधानी बनवले जाते.
उत्तराखंड – हिमाचल प्रदेशप्रमाणे, उत्तराखंड हे देखील एक डोंगराळ राज्य आहे, ज्याच्या दोन राजधान्या आहेत. पहिली राजधानी ‘डेहराडून’ आहे आणि ‘गैरसैन’ला तात्पुरती राजधानी बनवण्यात आली आहे. डोंगराळ भागात राजधानी विकसित करण्याच्या प्रदीर्घ मागणीनंतर ‘गैरसैन’ला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्यात आला.
महाराष्ट्र – महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, जी मायानगरी म्हणून ओळखली जाते. मुंबई व्यतिरिक्त, महाराष्ट्राची आणखी एक राजधानी आहे, जी हिवाळी राजधानी बनली आहे. महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर आहे.
लडाख – कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनले. यानंतर, लडाखमध्ये दोन राजधान्या स्थापन झाल्या, पहिली राजधानी ‘लेह’मध्ये आणि दुसरी ‘कारगिल’मध्ये आहे.
या राज्यांव्यतिरिक्त, कर्नाटकला दोन राजधान्या असल्याचे मानले जाते, पहिली राजधानी बेंगळुरू आहे आणि बेळगाव दुसरी राजधानी म्हणून ओळखले जाते.





