रोडरोमिओंना हटकल्याने शिक्षकांवरच दगडफेक

नगर: विद्यार्थिनींची छेडछाड का करता, अशी विचारणा केल्याच्या रागातून आठ ते दहा रोडरेामिओंनी शिक्षकांवर दगडफेक केली. आज दुपारी लालटाकी रस्त्यावरील रेसिडेन्शिअल हायस्कूल परिसरात ही घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रस्त्याने ये-जा करणारे काही टारगट मुले विद्यार्थिनींची छेडछाड करीत होते. ही घटना विद्यार्थिंनीनी शिक्षकांच्या कानावर घातली. रेसिडेन्शिअल हायस्कूल परिसरात त्यातील एक मुलगा आज आला होता. विद्यार्थिंनीनी तो शिक्षकाला दाखवला. शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांला मुलींची छेडछाड का करतो, तसे केल्यास तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे समजावले. संतापलेला रोडरेामिओ तिथून निघून गेला.

काही वेळातच त्याने आठ ते दहा जणांचे टोळके तेथे आणले व शिक्षकांना शिवीगाळ, दमदाटी करु लागला. तसेच शिक्षकांवर जोरदार दगडफेक केली. यातुन एकच गोंधळ उडला. विद्यार्थिंनीची छेडछाड केल्याची विचारणा केल्याच्या रागातून शिक्षकांवर दगडफेकीची घटना समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.