Asim Munir : बलुचिस्तानमधील दहशतवादी हे विदेशी; पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचा आरोप
बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेले दहशतवादी हे विदेशी असल्याचे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल जनलर आसिम मुनीर (Asim Munir) यांनी म्हटले आहे.

Asim Munir : बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेले दहशतवादी हे विदेशी असल्याचे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल जनलर आसिम मुनीर (Asim Munir) यांनी म्हटले आहे. हे दहशतवादी प्रांतीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले विदेशांच्या पाठिंब्यावरील दहशळतवादी गटांचे दहशतवादी असल्याचे मुनीर यांनी म्हटले आहे.
बलुचिस्तानमधील प्रमुख व्यक्ती आणि राजकीय नेत्यांशी संवाद साधत असताना मुनीर (Asim Munir) यांनी ही टिप्पणी केल्याचे लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
खनिजसंपन्न प्रांतासाठी स्वातंत्र्य मिळवू पाहणाऱ्या, बेकायदेशीर ठरवलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी सारख्या गटांच्या नेतृत्वाखाली बलुचिस्तानमध्ये दीर्घकाळापासूनच्या फुटीरतावादी बंडखोरी सुरू आहे. बलुचिस्तान आणि पाकिस्तानचे वर्तमान आणि भविष्य हे एक आणि कायमचे आहे, यावर मुनीर यांनी जोर दिला.
बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेले दहशतवादी विदेशी पाठिंब्यावर सक्रिय आहेत. या दहशतवाद्यांना बलुचिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी, विकाससकार्यात अडथळे आणण्यासाठी आणि फुटिरता निर्माण करण्यासाठी शत्रू देशातून मदत मिळते आहे, असे कोणत्याही देशाचा नामोल्लेख न करता मुनीर म्हणाले.
बलुचिस्तानचे भवितव्य केवळ तेथील नागरिकांच्या हाती आहे. बलुचिस्तानला राजकीय दृष्टीने वाळीत टाकण्यात आले आणि तेथील नैसर्गिक स्रोतांचे राष्ट्रीय सरकारकडून वारेमाप उत्खनन केले जात असल्याच्या कारणाने बंडखोरांकडून स्वातंत्र्याची मागणी केली जाते आहे.
याशिवाय चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या प्रकल्पांवरील (Asim Munir) चिनी कामगारांवरही बलुच बंडखोरांकडून हल्ले केले जात आहेत. मे महिन्यात बलुच बंडखोरांनी क्वेट्टाकडे जाणाऱ्या रेल्वेवर आत्मघातकी बॉम्बहल्ला केला होता. त्यात किमान ४७ ठार आणि ९८ जखमी झाले होते.






