Asian Olympic Qualifiers Shooting 2024 : अखिल शेओरानला सुवर्ण तर तोमरला रौप्यपदक…
Updated On:

Asian Shooting Championship 2024 : भारतीय नेमबाज अखिल शेओरान आणि ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनी शुक्रवारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
अखिल शेओरानने अंतिम फेरीत 460.2 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने 459.0 गुणांसह रौप्यपदक जिंकले. तर थायलंडचा नेमबाज टी वोंगसुकडीने 448.8 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
दरम्यान, पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक स्पर्धेत अखिल शेओरान, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि स्वप्नील कुसळे यांनी एकूण 1758 गुण मिळवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. पीपुल्स रिपब्लिक ऑफ चाइनाने 1744 गुणांसह रौप्य पदक जिंकले, तर रिपब्लिक ऑफ कोरियाने 1735 गुणांसह कांस्यपदक जिंकले.





