हांगझोऊ :– चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या गोळाफेक (Women’s Shot Put-F34 event) गटात भारताच्या भाग्यश्री जाधव हने रौप्यपदक मिळवले आहे. भाग्यश्री ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज गावातील रहिवासी आहे. भाग्यश्रीने 7.54 मीटर अंतर नोंदवले.
Silver dazzles for 🇮🇳 🥈at #AsianParaGames2022 🥳
In Women’s Shot Put-F34, the silver medal is won by Bhagyashri Madhavrao Jhadav with an impressive throw of 7.54m, showcasing incredible sports prowess.🙌💪
Congratulations to Bhagyashri on this well-deserved silver! 🥈👏🌟… pic.twitter.com/0RfbfXfNEw
— SAI Media (@Media_SAI) October 26, 2023
या स्पर्धेच्या इतिहासात यंदा भारताने 80 पदके मिळवत इतिहास रचला आहे. त्यात 18 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भारताने 2018 च्या इंडोनेशियामधील जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत 72 पदके जिंकली होती. ती कामगिरी यंदा भारताने मागे टाकली. भारताने आतापर्यंत 18 सुवर्ण, 23 रौप्य तर, 39 ब्रॉंझ अशी एकूण 80 पदके मिळवली आहेत.
पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन….
Congratulations to Bhagyashri Madhavrao Jhadav for clinching the Silver medal in the Women’s Shot Put-F34 event at Asian Para Games. All the best for the endeavours ahead. pic.twitter.com/Zpcxov5k7W
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2023
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या गोळाफेक गटात भारताच्या भाग्यश्री जाधव हिने रौप्यपदक पटकावल्याबदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ” आशियाई पॅरा गेम्समध्ये महिला शॉट पुट-F34 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल भाग्यश्री माधवराव जाधव हिचे अभिनंदन. पुढील प्रयत्नांसाठी सर्व शुभेच्छा.”