Asian Games 2023 ( Women’s Boxing) : भारताची स्टार बॉक्सर लवलिनाने जिंकलं रौप्य पदक

हांगझोऊ :- भारताची ऑलिम्पिक पदक विजेती महिला मुष्टियुद्ध खेळाडू लवलिना बोरगोहेन हिने येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात 75 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. सुवर्ण पदकासाठी झालेल्या या सामन्यात चीनच्या ली कियान हिने लवलिनाचा 5-0 असा पराभव केला.
महिलांच्या 75 किलो वजनी गटात लोव्हलिना बोर्गोहेनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात तिला चीनच्या ली कडून पराभव पत्करावा लागला. सुरुवातीच्या फेरीत दोघांमध्ये अतितटीची लढत झाली. मात्र, दुसऱ्या फेरीत चीनच्या खेळाडूने चांगला खेळ करत सामना सहज जिंकला. लीने पहिली फेरी 3-2 आणि दुसरी फेरी 5-0 ने जिंकली.
SHINING SILVER🥈 FOR LOVLINA🌟
🇮🇳's Boxer and #TOPSchemeAthlete @LovlinaBorgohai wins the SILVER 🥈medal in the Women's 75 kg category 🇮🇳🏅
Her incredible prowess in the ring shines brighter than ever. Let's give her a thunderous round of applause! 🥳💪
Congratulations,… pic.twitter.com/i0qSwfD51o
— SAI Media (@Media_SAI) October 4, 2023
पंतप्रधानांकडून भारतीय खेळाडूंचे कौतुक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या भारतीय खेळाडूंचे आणि देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जास्त चमकदार कामगिरी केली आहे. खेळाडूंच्या अतुलनीय समर्पण, धैर्य आणि खिलाडूवृत्तीचेच हे यश आहे. संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची गोष्ट असून त्याबद्दल मी खेळाडूंचे अभिनंदन करतो, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.





