Asia Cup 2023 : उद्घाटन सोहळ्यासाठी पाकिस्तानला जाण्यास जय शहांचा नकार
Updated On:

मुंबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शहा पाकिस्तानला जाणार नाहीत, असा खुलासा बीसीसीआयचे सदस्य अरुण धुमल यांनी केला आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी शहा उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते.
दक्षिण आफ्रिकेत आशिया करंडक स्पर्धेबाबत तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतील सहभागाबाबत बीसीसीआय व पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सदस्यांमध्ये तसेच शहा व अश्रफ यांच्यात चर्चा झाली होती. मात्र, त्याचवेळी शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती, असेही धुमल म्हणाले.





