Ashwini Bidre Murder Case : PI अभय कुरुंदकर दोषी; कोर्टाच्या निर्णयानंतर अश्विनी बिद्रेच्या कुटूंबानी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : मागच्या सात वर्षांपासून चर्चेत असलेल्या API अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणी कोर्टाने PI अभय कुरुंदकर याला कलम 302 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी हे मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी सहभागी असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. तर आरोपी राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मृत अश्विनी बिद्रेच्या कुटुंबीयांनी दिली प्रतिक्रिया
प्रकरणात झालेला तपास आणि त्यावर वकिलांनी केलेली मांडणी यावर कोर्टाने मत व्यक्त केलं. त्याचप्रमाणे माझ्या मुलीचं म्हणणं कोर्टाने ऐकूण घेतलं. आज आम्ही समाधानी आहोत. निकाल काय येईल याचा अंदाज कोर्टाने दिला आहे, त्यामुळे आम्हाला अशा आहे योग्यच निकाल येईल, असा विश्वास आनंद बिद्रे यांनी व्यक्त केला आहे. मी सतत मागणी करतो आहे त्याची आज पूर्तता झाली. त्याचप्रमाणे मीडियाचे ही मनापासून आभार त्यांनी हे प्रकरण उचलून धरले आणि त्याच अनुषगाने आज न्याय मिळाला, असं आनंद बिद्रे म्हणाले.
काय आहे नेमके अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण?
अश्विनी बिद्रे 2005 मध्ये पोलिस दलात भरती झाली. सांगलीत पोस्टिंग असताना तिची अभय कुरुंदकरशी ओळख झाली. पुढे त्यांच्यात अनैतिक संबंध सुरु झाले. अश्विनी आणि अभय दोघेही विवाहित होते आणि त्यांना आपापली कुटुंबं होती. पण अभयने अश्विनीला आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे अश्विनीने आपल्या पती राजू गोरेसोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे, जी तिच्या वडिलांसोबत राहते.
यानंतर अश्विनीने अभय कुरुंदकरकडे लग्नासाठी तगादा लावला. पण कुरुंदकरला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. याच कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. कुरुंदकर त्याच्या पहिल्या पत्नीला आणि मुलांना सोडू शकत नव्हता, तर अश्विनी लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती. त्यामुळे त्याने अश्विनीची हत्या केली.





