Ashwini Bhide : ‘मेट्रो वूमन’ अश्विनी भिडे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती
वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Ashwini Bhide : वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अश्विनी भिडे (Ashwini Bhide) या आजच महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. निवृत्त होणाऱ्या भूषण गगराणी यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वूमन म्हणून भिडे यांची ओळख आहे. १९९५ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेल्या भिडे या यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी अनेक महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प हाताळले आहेत. त्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभारही पुढे चालू ठेवतील.
2015 मध्ये मुंबई मेट्रो-3 ची धुरा अश्विनी भिडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना मेट्रो वुमन म्हणून एक ओळख मिळाली. मुंबईच्या ॲक्वा लाईनच्या (मेट्रो लाईन 3) विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या मेट्रो जाळ्याच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी त्यांची प्रशासकीय कारकीर्द कोल्हापुरातून सरू केली. 1997 ते 1999 या काळात त्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. 27 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, मुंबई महानगर विकास प्रधिकरणात अतिरिक्त आयुक्त आणि शालेय शिक्षण-क्रिडा विभागाच्या सचिव म्हणूनही काम केले आहे.






