Ashwini Bhave: ट्रॅक्टरची स्वारी अन् वडाच्या पारंब्यांचा झोका! अश्विनी भावे रमल्या शेतात; पाहा Video
Ashwini Bhave: ट्रॅक्टरवर बसलेल्या, गुरांना चारा घालताना दिसतात. 'पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी जिथे आयुष्य पुन्हा खऱ्या अर्थाने जगल्यासारखं वाटतंय.

Ashwini Bhave: लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील उत्तम भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र सध्या अश्विनी भावे सिनेसृष्टीपासून दूर असून, अमेरिकेत स्थायिक आहेत.
अनेकदा त्या सोशल मीडियावर अमेरिकेतली घराची झलक, रेसिपी याचे व्हिडिओ शेअर करतात. मात्र आता त्यांनी भारतात येत गावाच्या शेतातील वसुंधरा दिनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अश्विनी भावे यांच्या व्हिडीओमध्ये त्या शेतात फिरताना, ट्रॅक्टरवर बसलेल्या, गुरांना चारा घालताना दिसतात. ‘पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी जिथे आयुष्य पुन्हा खऱ्या अर्थाने जगल्यासारखं वाटतंय. निसर्गाचा साधेपणा श्वासात भरून घेत, या शांततेचा अनुभव घेत आणि निसर्ग सहजरित्या जे सौंदर्य आपल्याला देतोय, त्याच्याशी पुन्हा नातं जोडत आहे. Ashwini Bhave
View this post on Instagram
या ‘वसुंधरा दिनी’ ही एक छोटीशी आठवण… आपण पृथ्वीची जितकी काळजी घेऊ, तितकीच ती आपल्याला भरभरून देईल.” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. तर या व्हिडीओला त्यांनी ‘मन रानात गेलं गं…’ हे गाणं बॅकग्राऊंडला लावलं आहे. (Ashwini Bhave)
यावेळी त्या शेतकऱ्यांशी, त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत आहेत. इतकेच काय तर लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत वडाच्या झाडाच्या पारंब्याला धरुन झोका घेतानाही दिसत आहेत. अश्विनी भावे यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस पडला आहे. अनेकांनी त्यांच्या या साधेपणाचे कौतुक केले आहे. (Ashwini Bhave)
हेही वाचा:



