Ashutosh Ranka: “आता तर कुठे कॉकरोचांनी सुरु केलंय…” ; आशुतोष रांका यांचे हिमंता बिस्वा सरमा यांना आव्हान
Ashutosh Ranka:

Ashutosh Ranka: कॉकरोच जनता पक्षाचे नेते आशुतोष रांका यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, “सीजेपीसाठी ही तर फक्त सुरुवात आहे.”
रांका काल गुवाहाटीत आले होते आणि त्यांची सीजेपीची सभा होणार होती. असा दावा केला जात आहे की,”पोलिसांनी त्यांना सभा घेण्यापासून रोखले. त्यानंतर रांका यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर सोडण्यात आले. यावर सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, ताब्यातून सुटका झाल्यानंतर रांका यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, “हिमंता बिस्वा सरमा, आसामच्या झुरळांची तर आता कुठे सुरुवात झाली आहे.” आशुतोष यांनी या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ते काही लोकांसोबत जेवण करताना दिसत आहेत.
रांका यांच्याबद्दल दीपके काय म्हणाले? Ashutosh Ranka:
रांका यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, पोलिसांनी त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्यानंतर सोडले आहे. दीपके यांनी लिहिले, “काल पोलीस ठाण्यातील आंदोलनात मी सुद्धा तुमच्यासोबत सामील होणार होतो.”
Himanta Biswa Sarma,
Cockroaches of Assam are just getting started! pic.twitter.com/VFFUfQOsSq
— Ashutosh Ranka (@AshutoshRanka) September 27, 2026
अटक केल्यानंतर आशुतोष यांची सुटका Ashutosh Ranka:
आज सकाळी एका सभेपूर्वी, विरोधी पक्ष आसाम जातीय परिषद (एजेपी) नेते कुंकी चौधरी यांच्या चौधरी टिला येथील निवासस्थानातून रांका आणि सीजेपीच्या ४० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गटाला शहरातील काहिलीपाडा भागातील आसाम पोलिसांच्या १० व्या बटालियनच्या मुख्यालयात नेण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सुटकेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आशुतोष रांका म्हणाले, “आसाम पोलिसांनी मला आणि माझ्या टीमला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले. आम्हाला कोणत्या आधारावर ताब्यात घेण्यात आले, असे आम्ही पोलिसांना विचारले, पण पोलिसांनी सांगितले की त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही आणि त्यांना वरिष्ठांकडून आदेश मिळाले आहेत.”





