Ashutosh Ranka & Saurabh Das : रांका, दास यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल
कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते आशुतोष रांका, सौरभ दास (Ashutosh Ranka & Saurabh Das) आणि इतर काही सदस्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Ashutosh Ranka & Saurabh Das : कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते आशुतोष रांका, सौरभ दास (Ashutosh Ranka & Saurabh Das) आणि इतर काही सदस्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात परवानगीशिवाय शिरकाव केल्याबद्दल ते पाऊल उचलण्यात आले.
आंदोलनांसाठीचे अधिकृत स्थळ म्हणून जंतर-मंतरला देण्यात आलेला दर्जा रद्दबातल करण्यात आला. त्यानंतरही जंतर-मंतरवर आंदोलनासाठी आग्रही असणाऱ्या सीजेपीच्या एका गटाने मंगळवारी त्या परिसरात शिरकाव केला. त्यामध्ये रांका, दास आणि अजिंक्य शिंदे यांचाही समावेश होता. नियमभंगाबद्दल कारवाई करत पोलिसांनी त्या तिघांसह सीजेपीच्या ११ सदस्यांना ताब्यात घेतले.
आता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जंतर-मंतरवर आंदोलन करण्याचा अधिकार अधोरेखित करण्यासाठी त्या परिसरात शिरकाव केल्याची भूमिका सीजेपीकडून मांडण्यात आली. जंतर-मंतरचा आंदोलनस्थळ म्हणून दर्जा काढून घेण्याच्या निर्णयाविषयी सीजेपी, विरोधी पक्ष आणि नागरी संघटनांकडून नाराजी (Ashutosh Ranka & Saurabh Das) व्यक्त केली जात आहे.
जंतर-मंतरला पुन्हा आंदोलनस्थळाचा दर्जा मिळवून देण्याचा निर्धार विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने व्यक्त केला. अशात सीजेपीच्या (Ashutosh Ranka & Saurabh Das) सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची घडामोड घडली. त्यामुळे जंतर-मंतरचा मुद्दा आणखीच तापण्याची शक्यता बळावली आहे.






