Indapur News : इंदापूर शहरातील अष्टविनायक यात्रेकरूंनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

इंदापूर : इंदापूर शहर मधील छत्रपती शिवाजी मित्र मंडळ खडकपुरा यांच्यातर्फे तीन दिवसांची अष्टविनायक यात्रा भक्तिभावात पार पडत आहे. यामध्ये ९० गणेश भक्तांनी पुण्यात जाऊन,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत श्री. दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंगलदर्शन घेतले.
यावेळी गणेश भक्तांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने व इंदापूरचे सर्व गणेश भक्त उपस्थित होते.यावेळी अन्नदान प्रदीप गारटकर यांच्या वतीने करण्यात आले.
इंदापूर शहरातून तीन दिवशीय अष्टविनायक दर्शन यात्रा आयोजित करून छत्रपती शिवाजी मित्र मंडळ यांनी संस्कृती आणि श्रद्धेची अनुभवता यात्रेकरूंना दिली. यामुळेच एकात्मतेचा अनुभव मिळतो आहे.असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काढले.





