अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव; मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

Ashok Saraf | Rohini Hattangadi | Akhil Bharatiya Marathi Natya Parishad – मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यानंतर अनेक मराठी नाट्यप्रेमींकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 14 जून 2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता माटुंगामधील यशवंत नाट्य संकुलात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे.
दरवर्षी नाट्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या रंगकर्मीचा मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सत्कार केला जातो. याही वर्षी हा सन्मान सोहळा केला जाणार आहे. नुकतेच 100वे नाट्य संमेलन पार पडले.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला ‘नाट्य कलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिकप्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्य संगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम सादर होणार आहेत.
14 जूनला यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल येथे संध्याकाळी 4 वाजता हे सर्व पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.
पुरस्कारप्राप्त सन्मानितांची यादी :-
- लीला मेहता पुरस्कृत भार्गवराम पांगे कार्यकर्ता पुरस्कार : गणेश तळेकर
- डॉ. न. अ. बरवे स्मृती पुरस्कार : प्रशांत जोशी
- कमलाकर वैशंपायन स्मृती पुरस्कार : दीपाली घोंगे
- कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृती पुरस्कार : शशांक लिमये (सर्वोत्तम निवेदक)
- बाळकृष्ण भोसले स्मृती पुरस्कार : विजय जगपात (गुणी रंगमंच कामगार)
- वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षा पुरस्कार : संजय देवधर (समीक्षण)
- अ. सी. केळुस्कर स्मृती पुरस्कार – गोविंद गोडबोले (बालरंगभूमीवरील योगदानानिमित्त)
- सर्वोत्कृष्ट नाट्य व्यवस्थापक : प्रणीत बोडके
- नाट्य मंदार पुरस्कार : अशोक ढेरे
- उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार : अशोक बेंडखळे
- कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार : श्याम आस्करकर
- विशेष पुरस्कार : स्व: रितेश सांळुके (कार्यकर्ता पुरस्कार)
- लोककलावंत पुरस्कार : सुनील बेंडखळे





