अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची जुगलबंदी असलेल्या ‘लाईफलाईन’ सिनेमाचा टीझर रिलीज

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची जुगलबंदी असलेल्या ‘लाईफलाईन’ सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात आता या टिझरने ही उत्सुकता अधिकच वाढवली आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘या’ कलाकारांनी चित्रपटात साकारली महत्वाची भूमिका?
क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. साहिल शिरवईकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांनी लिहिली आहे.
अशोक पत्की यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. तर या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.





