Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या फसवेगिरीचा पॅटर्न समोर
स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या फसवणुकीचे आणखी एक धक्कादायक पॅटर्न समोर आले आहे.

Ashok Kharat Case : स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या फसवणुकीचे आणखी एक धक्कादायक पॅटर्न समोर आले आहे.
लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या खरातने (Ashok Kharat Case) शाकाहारी, विशेषतः कट्टर शाकाहारी जैन धर्मीय बड्या व्यावसायिकांना मासे खाण्यासाठी दबाव टाकून फसवणूक केल्याचे SIT (विशेष तपास पथक) च्या तपासात उघड झाले आहे.
खरात (Ashok Kharat Case) हा आपल्या भक्तांना आणि अनुयायांना “मासा ही पाण्यातील वनस्पती (जलवनस्पती) आहे” असे सांगून प्रसादाच्या नावाखाली मासे खाऊ घालत होता. तो म्हणायचा की, “माशाला रक्त येत नाही, हाडे नसतात, म्हणून तो शाकाहारी मानला जावा.” या खोट्या तर्काने त्याने अनेक शाकाहारी व्यक्तींची दिशाभूल केली आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे.
नेमका प्रकार काय?
SIT च्या चौकशीत उघडकीस आलेल्या माहितीनुसार, खरात आपल्या अनुयायांना मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी किंवा विशेष आशीर्वाद देण्यासाठी ‘प्रसाद’ म्हणून मासे खाण्याचा आग्रह करायचा. विशेषतः जैन व्यापारी आणि कट्टर शाकाहारी बड्या व्यावसायिकांना या पद्धतीने फसवण्यात आले.
त्यांना भीती घालून किंवा आध्यात्मिक फायद्याचे आमिष दाखवून मासे खाण्यास भाग पाडले जात होते. या फसवणुकीतून खरातने मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घेतल्याचेही तपासात दिसून आले आहे.
खरातवर आधीच गंभीर आरोप
अशोक खरातवर (Ashok Kharat Case) आधीच महिलांवर लैंगिक शोषण, बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. SIT च्या तपासात दररोज नवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. यापूर्वी त्याने ‘तुर्कीश हनी’ सारख्या बनावट उत्पादनांच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचेही उघड झाले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे आणि SIT त्याची सखोल चौकशी करत आहे. त्याच्या पत्नी फरार असून, मुलगा अटकेत आहे.






