Rajasthan : मुख्यमंत्री गहलोत पाठोपाठ माजी मुख्यमंत्री ‘वसुंधरा राजे’ही Covid-19 पॉझिटिव्ह

जयपूर : राजस्थानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढत आहे. दरम्यान, जयपूरमधून एक मोठी बातमी येत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कोरोना पॉझिटिव्ह आले असून, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. (Ashok Gehlot, Vasundhara Raje test Covid positive) मुख्यमंत्री गहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विट केले आहे की, “कोविडच्या तपासणीत माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पूर्णपणे आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्या आणि खबरदारी घ्या.”
कोविड की जांच में मेरी रिपोर्ट पॉजिटिव आई है।
चिकित्सकों की सलाह पर मैं पूर्ण रूप से आइसोलेशन में हूं। जो लोग मेरे संपर्क में रहे, वे अपनी जांच करवाएँ और सावधानी बरतें।— Vasundhara Raje (@VasundharaBJP) April 4, 2023
दरम्यान, वसुंधरा राजे यांनी गेल्या 1-2 दिवसांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. सोमवारी राज्यात कोरोना संसर्गाचे 17 नवीन रुग्ण आढळून आले असून काल सायंकाळपर्यंत 189 बाधितांवर उपचार सुरू होते.
ट्विटमध्ये गेहलोत यांनी म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोविडची-19 प्रकरणे वाढली आहेत. मला स्वतःला सौम्य लक्षणांसह कोविडची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील काही दिवस माझ्या निवासस्थानातून काम करत राहीन. तुम्ही सर्वजण काळजी घ्या आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करा.
पिछले कुछ दिनों में देशभर में कोविड के मामले बढ़े हैं। मैं स्वयं भी हल्के लक्षणों के साथ कोविड से संक्रमित हो गया हूं। डॉक्टरों की सलाह के अनुसार अगले कुछ दिन निवास से ही कार्य जारी रखूंगा। आप सब सावधानी बरतें एवं कोविड प्रोटोकॉल का पालन करें।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) April 4, 2023
दरम्यान, अशोक गेहलोत यांनी एक दिवस आधी राहुल गांधींचे सुरतमध्ये स्वागत केले होते. न्यायालयात जाताना ते राहुल गांधी यांच्यासोबत गेले आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते.





