अशोक चव्हाणांनी थेट रुग्णालयातून केल्या केंद्र सरकारकडे ‘या’ मागण्या

Updated On:
अशोक चव्हाणांनी थेट रुग्णालयातून केल्या केंद्र सरकारकडे ‘या’ मागण्या

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र अशा परिस्थितीतही चव्हाण यांचं राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष आहे. चव्हाण यांच्या सक्रियतेचा प्रत्यय त्यांनी थेट रुग्णालयातून एक व्हिडीओ शेअऱ केल्याने आला असून या व्हिडीओमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या ‘स्पीक अप इंडिया’ मोहिमेबद्दल सांगितलंय. या व्हिडिओमध्ये त्यांनी केंद्र सरकारकडे सर्वसामान्यांच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती देखील केली आहे.

या व्हिडीमध्ये अशोक चव्हाण सांगतायेत की, “सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. कोट्यवधी देशवासियांचे जे मनोगत आहे, त्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीने मीदेखील मुंबईतील रुग्णालयातून करोनाशी लढा देत असताना ‘स्पीक अप इंडिया’ या मोहिमेत सहभागी होत आहे. केंद्र सरकारला जाणीव आणि विनंती करायची आहे की, करोनाचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य, शेतमजूर, शेतकरी आणि गरिबांना बसला आहे. लघू-मध्यम उद्योगांनाही फटका बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये मी सहभाग नोंदवत आहे”.

https://www.facebook.com/ashokchavanofficial/videos/676074026289081/

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...