“आमच्यात राजकीय मतभेद होते, पण व्यक्तिगत संबंध चांगले” ; वसंत चव्हाण यांच्या निधनाने अशोक चव्हाण भावुक

Ashok Chavan on Vasant Chavan । लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या अजस्त्र ताकदीला धक्का देत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वसंत चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यांच्यावर हैदराबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे नांदेडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात शोकाकुल वातावरण आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
आमचे व्यक्तिगत संबंध चांगले होते Ashok Chavan on Vasant Chavan ।
अशोक चव्हाण यांनी वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, ही अतिश्य दु:खद घटना आहे. मला पहाटे त्यांच्या निधनाबाबत कळाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरु होते. ते आमचे जुने सहकारी होते, आमदार होते. त्यांचे अनुभवी नेतृत्त्वाचा आम्ही अनुभव घेतला होता. आमच्यात राजकीय मतभेद असतील पण आमचे व्यक्तिगत संबंध चांगले होते, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे काम Ashok Chavan on Vasant Chavan ।
आम्ही नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी एकमेकांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यायचो. त्यांचं जाणं दु:खद आहे. सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्ह्यातील राजकारणाची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.





