‘लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची’; ‘त्या’ फोटोवरून खासदार नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कवितेच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचे दोन फोटो पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.
‘ते’ 2 फोटो केले पोस्ट
शिंदे गटाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तसेच प्रवक्ते असलेल्या म्हस्के यांनी एक कविता पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. म्हस्के यांनी ही कविता पोस्ट करताना उद्धव ठाकरेंनी आबू आझमींची भेट घेतल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आझमी उद्धव ठाकरेंच्या हातून पुष्पगुच्छ स्वीकारताना दिसत असून शाल देऊन आझमींचं स्वागत झाल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत अबू आझमी बाबरी मशीदीचं बॅनर घेऊन उभे आहेत. या बॅनरवर ‘बाबरी मशिदीला न्याय कधी मिळणार?’ असं लिहिलेलं आहे.
लाज वाटते रे! तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची.
एक तरी खूण जोपासा,
त्यांचं रक्त असल्याची.हिरव्या अवलादींना आणून त्यांना कुर्निसात करता,
हिंदुत्वाची खोटी नाटकं,
लोकांसमोर करता.ज्या राक्षसाने शेकडो कारसेवकांचे मुडदे पाडले,
ज्या दैत्याने शेकडो #हिंदू अयोध्येत गाडले.त्याला… pic.twitter.com/Oa2AzKFrgc
— Naresh Mhaske (@nareshmhaske) July 23, 2024
कवितेच्या माध्यमातून केली टीका
“लाज वाटते रे! तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची…
एक तरी खूण जोपासा, त्यांचं रक्त असल्याची…
हिरव्या अवलादींना आणून त्यांना कुर्निसात करता…
हिंदुत्वाची खोटी नाटकं लोकांसमोर करता,”
ज्या राक्षसाने शेकडो कारसेवकांचे मुडदे पाडले,
ज्या दैत्याने शेकडो हिंदू अयोध्येत गाडले.
त्याला जवळ घेता आणि गप्पा हिंदुत्वाच्या मारता,
अरे षंढ मुर्दाडांनो! कोणाला तुम्ही फसवता?
बाळासाहेब म्हटले होते, बाबरी पडणाऱ्यांचा गर्व आहे.
तुम्ही कारसेवकांच्या खुन्यांचा सत्कार करता, यातच सारे मर्म आहे.
लाज वाटते रे! साहेबांचे रक्त, असे हिरवे हिरवे होताना पाहून,
किती क्लेश होत असतील साहेबांना तिथे स्वर्गात राहून….





