Asha Bhosle Video : “मी गात असतानाच, मला मरण यावं…”; स्वतः आशाताईंनी बोलून दाखवलेली शेवटची इच्छा !
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातत्यांचं निधन झालं.

Asha Bhosle : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातत्यांचं निधन झालं.
हिंदी सिनेसृष्टीची सुपरस्टार सिंगर कोण? असं विचारलं तर सर्वात आधी आशाताईंचं नाव ओठी येतं. आशा भोसले संगीतातील विविध प्रयोगांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये तब्बल 12 हजारांहून अधिक गाणी गायली.
सिनेसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या अजोड योगदानाची दखल घेऊन, त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
मी गात असतानाच, मला मरण यावं…
अमृता रावच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना आशाताई म्हणाल्या की, “माझे देवाकडे एकच मागणे आहे, मी गात असतानाच, मला मरण यावे… बास्स… हीच माझी मनापासून इच्छा आहे. आता माझ्यासाठी शिकण्यासारखे काहीच उरलेले नाही.
View this post on Instagram
आता आणखी काय शिकायचे बाकी आहे? गाणे हेच माझे आयुष्य आहे. मी अगदी बालपणापासून गात आले आहे. विशेषतः वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मी माझ्या वडिलांकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केलेली.
माझे संपूर्ण आयुष्य मी याच कलेला समर्पित केले आहे. मी सिनेसृष्टीत 80 ते 82 वर्ष व्यतीत केली आणि आता माझी अंतिम इच्छा केवळ हीच आहे की, मी या जगाचा निरोप घ्यावा. जर गात असतानाच मी या जगातून एक्झिट घेतली, तर त्यामुळे मला सर्वाधिक आनंद होईल…” असं त्या म्हणाल्या होत्या.
आशा ताईंच्या योगदानाची दखल…
१९८७ : नाईटिंगेल ऑफ एशिया
१९९९ : आंतरराष्ट्रीय संगीतातील योगदानासाठी स्क्रीन पुरस्कार
१९९९ : महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार
२००० : दादासाहेब फाळके पुरस्कार
२००० : सिंगर ऑफ द मिलेनियम (दुबई)
२००२ : जीवनगौरव पुरस्कार
२००२ : आयफा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार
२००२ : स्टार स्क्रीन सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार
२००२ : बीबीसी जीवनगौरव पुरस्कार (ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते प्रदान)
२००३ : भारतीय संगीतातील उत्कृष्ट योगदानासाठी स्वरालय येसुदास पुरस्कार
२००८ : पद्मविभूषण पुरस्कार
२०११ : आयफा जीवनगौरव पुरस्कार
२०१३ : पंडित हृदयनाथ जीवनगौरव पुरस्कार
२०१४ : ग्लोबल इंडियन म्युझिक अकॅडमी अवॉर्ड्स तर्फे म्युझिक लिव्हिंग लीजेंड अवॉर्ड
२०१४ : दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार
२०१८ : यश चोप्रा मेमोरियल पुरस्कार
२०१८ : दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
२०१८ : बंग विभूषण पुरस्कार (पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार)
२०२१ : महाराष्ट्र भूषण पुरस्कार






