Asha Bhosle : विलक्षण योगायोग! लता दीदी आणि आशा ताईंच्या निधनामध्ये अजब साम्य; पाहून सर्वच झाले थक्क!
Asha Bhosle And Lata Mangeshkar : एक विलक्षण साम्य म्हणजे, आशा भोसले यांचे निधन झाले तेव्हाही त्यांचे वय 92 वर्षेच होते.

Asha Bhosle And Lata Mangeshkar : भारतीय संगीत क्षेत्रात सुमधुर आवाजाने आठ दशकांहून अधिक काळ रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीसह सर्वसामान्य चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे. Asha Bhosle And Lata Mangeshkar
वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी, वडिलांच्या निधनानंतर संसाराची धुरा खांद्यावर घेतलेल्या आशाताईंचा प्रवास संघर्षानेच सुरू झाला. थोरली बहीण लता दीदींच्या अफाट लोकप्रियतेच्या सावलीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं मोठं आव्हान होतं पण आशाताईंनी कधीही हार मानली नाही. दोघींनी संगीत क्षेत्रात मोठं यश मिळवलं. मात्र या दोघे बहिणींच्या निधनाशी संबंधित एका योगायोगाबद्दल सध्या चर्चा सुरू झाली आहे. Asha Bhosle And Lata Mangeshkar
लता मंगेशकर यांचे निधन फेब्रुवारी 2022 मध्ये झाले होते आणि त्यावेळी त्यांचे वय 92 वर्षे होते. यात एक विलक्षण साम्य म्हणजे, आशा भोसले यांचे निधन झाले तेव्हाही त्यांचे वय 92 वर्षेच होते. तसेच लता दीदी या मृत्यू रविवारी झाला होता. Asha Bhosle And Lata Mangeshkar
Asha Bhosle : विलक्षण योगायोग! लता दीदी आणि आशा ताईंच्या निधनामध्ये अजब साम्य; पाहून सर्वच झाले थक्क!
९२ व्या वर्षी, रविवारी आणि एकाच रुग्णालयात निधन (Asha Bhosle)
त्याचप्रमाणे आशा ताईंचाही मृत्यू रविवारी झाला. या दोन बहिणींच्या निधनाबाबतचा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण योगायोग मानला जात आहे. दोन्ही भगिनींनी वयाच्या ९२ व्या वर्षी, रविवारी आणि ब्रीच कॅंडी या एकाच रुग्णालयात जगाचा निरोप घेतला, हा एक हृदयस्पर्शी योगायोग ठरला आहे.
या बहिणींच्या वयातील फरकाबद्दल बोलायचे झाले तर, लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला होता, तर आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. या दोन बहिणींच्या वयात चार वर्षांचे अंतर होते. लतादीदींच्या निधनानंतर बरोबर चार वर्षांनी, आशाताईंनीही या जगाचा निरोप घेतला.
दरम्यान, आशा भोसले यांनी २० हून अधिक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गायली. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘ये मेरा दिल’ आणि ‘चुरा लिया है तुमने’ यांसारख्या गाण्यांनी त्यांनी अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले. त्यांच्या महान कार्यासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेयर अशा बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
Asha Bhosle And Lata Mangeshkar
हेही वाचा:
Maharashtra Government : राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता डिसेंबरपर्यंत ६०% निधी खर्च करणे बंधनकारक





