आसाराम बापूला दिलासा: गुजरात हायकोर्टाने 3 महिन्यांसाठी अंतरिम जमानत वाढवली

Asaram Bapu: गुजरात हायकोर्टाने बलात्कार प्रकरणात आजीवन कारावास भोगत असलेल्या आसाराम बापूला मोठा दिलासा दिला आहे. त्याची 31 मार्चला संपणारी अंतरिम जमानत 3 महिन्यांनी वाढवून 30 जून 2025 पर्यंत कायम ठेवली आहे. वैद्यकीय कारणांमुळे कोर्टाने हा निर्णय घेतला.
यापूर्वी सुप्रीम कोर्टाने 2013 च्या बलात्कार प्रकरणात 86 वर्षीय आसाराम बापूला मेडिकल आधारावर 31 मार्चपर्यंत सशर्त अंतरिम जमानत मंजूर केली होती. जस्टिस एम. एम. सुंदरेश आणि जस्टिस राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने मानवीय दृष्टिकोनातून त्यांच्या गंभीर आजारांवर उपचारासाठी ही मुभा दिली. जमानत काळात पुराव्यांशी छेडछाड न करणे आणि अनुयायांना न भेटणे अशा अटी घालण्यात आल्या होत्या.
आसाराम याची 6 महिन्यांची मागणी –
आसाराम बापूनी हायकोर्टात 6 महिन्यांच्या अंतरिम जमानतासाठी अर्ज केला होता. त्याच्या वकिलाने सांगितलं की, डॉक्टरांनी 90 दिवसांची पंचकर्म थेरपी सुचवली आहे. जस्टिस इलेश जे. वोरा आणि जस्टिस संदीप एन. भट्ट यांच्या खंडपीठात यावर मतभेद झाले. जस्टिस वोरा यांनी 3 महिन्यांची जमानत मान्य केली, तर जस्टिस भट्ट यांनी विरोध केला. त्यानंतर तिसरे न्यायाधीश जस्टिस ए. एस. सुपेहिया यांनी जमानत वाढवण्याच्या बाजूने कौल दिला. या निर्णयामुळे आसाराम बापूना तूर्तास जेलबाहेर राहण्याची संधी मिळाली असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जाणार आहे.





