‘कमकुवतांच्या गर्दीसाठी एकच व्यक्ती पुरेशी..’ ; असदुद्दीन ओवैसींनी वक्फ विधेयकाची प्रत फाडून नोंदवला निषेध

Asaduddin Owaisi on Waqf Bill । एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी रात्री लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ च्या मसुद्याची प्रत फाडून निषेध केला. सभागृहात विधेयकावरील चर्चेत भाग घेताना ओवेसी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच “हा भारताच्या श्रद्धेवर हल्ला आहे आणि मुस्लिमांना अपमानित करण्यासाठी आणले गेलेले विधेयक असल्याचे म्हटले. तसेच “हे विधेयक आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याक गटाविरुद्ध युद्ध पुकारले आहे.” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
“कमकुवतांच्या गर्दीसाठी एकटा माणूस पुरेसा” Asaduddin Owaisi on Waqf Bill ।
दिल्ली एआयएमआयएमचे अध्यक्ष शोएब जमाई यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, “कमकुवतांच्या गर्दीसाठी एकटा माणूस पुरेसा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत भाषण करताना निषेध नोंदवण्यासाठी वक्फ विधेयकाची प्रत फाडली. लक्षात ठेवा, त्यांनी संसदेत सीएए कायदा विधेयक देखील फाडले होते.”असे त्यांनी म्हटले.
एक अकेला ही बुजदिलों की भीड़ के लिए काफी है।✊👏
राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब ने विरोध दर्ज करने के लिए वक़्फ़ बिल की कॉपी को संसद में भाषण के दौरान फाड़ डाला।
याद कीजिए, उन्होंने CAA कानून के बिल को भी संसद में फाड़ दिया था। pic.twitter.com/XkDeyGmgnN— Dr. Shoaib Jamai (@shoaibJamei) April 2, 2025
विरोधी पक्षाच्या खासदारांच्या विरोधानंतर वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. पाच महिन्यांत ३८ बैठकींनंतर समितीने आपल्या सूचना दिल्या. समितीच्या सूचनांचा समावेश असलेले वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५ बुधवारी लोकसभेत सादर करण्यात आले.
वक्फ विधेयकाच्या विरोधात Asaduddin Owaisi on Waqf Bill ।
लोकसभेने वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ हे २८८ विरुद्ध २३२ मतांनी मंजूर केले, अनेक विरोधी सदस्यांनी मांडलेल्या सुधारणा फेटाळून लावल्या. सभागृहाने मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक, २०२४ ला आवाजी मतदानाने मंजुरी दिली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपचे सहयोगी पक्ष – जद(यू), तेलगू देसम पार्टी (टीडीपी), लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), जनसेना आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाला पाठिंबा दिला.
झारखंडमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एजेएसयूनेही या विधेयकाला पाठिंबा दिला. काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला आणि ते असंवैधानिक आणि मुस्लिमांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.





