Asaduddin Owaisi : असीम मुनीर काहीही बोलत आहेत; असदुद्दीन ओवेसी यांची टीका

हैदराबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या अमेरिकेच्या भूमीवरून भारताविरुद्धच्या ताज्या अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या विधानाची निंदा करणे आवश्यक झाले आहे. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्याचे राजकीय उत्तर द्यावे. मुनीर अगदीच शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे बोलत आहेत, अशी टीका एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
असीम मुनीर यांच्या धमकीवर ओवेसी म्हणाले, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि त्यांच्या धमक्या निंदनीय आहेत. हे दुर्दैवी आहे की हे अमेरिकेकडून येत आहे, जे भारताचे धोरणात्मक भागीदार आहे. ते रस्त्यावरच्या माणसासारखे बोलत आहेत. पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या डीप स्टेटकडून सतत येणाऱ्या धमक्या पाहता, आपल्याला आपले संरक्षण बजेट वाढवावे लागेल जेणेकरून आपण तयार राहू शकू.
यापूर्वी, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताला धमकी दिली होती. मुनीर म्हणाले होते की जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठी धरण बांधले तर आपल्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही. आम्ही १० क्षेपणास्त्रे डागून धरण उडवून देऊ. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुनीरने फ्लोरिडातील टाम्पा येथे पाकिस्तानी वंशाचे व्यापारी अदनान असद यांनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमात ही धमकी दिली होती. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या टिप्पण्यांवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.





