Pune District : थंडीचा कडाका वाढल्याने शेकोटीची ऊब

आळंदी : गेल्या काही दिवसां पासून कडाक्याची थंडी पडत असून आळंदी व ग्रामीण भाग परिसरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक पहाटे व रात्री पाला पाचोळा, लाकडे, टाकाऊ कागद, पुठ्ठे आदींचा वापर करून शेकोट्या पेटवून ऊब घेत गप्पा गोष्टी करताना दिसत आहेत.
मोबाइलमध्ये अडकलेली आजची पिढी शेकोटीच्या निमित्ताने घराबाहेर पडताना दिसते. शेकोटीतून एकमेकांशी संवाद साधला जात असून व शेकोटीची हवीहवीशी ऊब घेताना ते दिसत आहेत.
गेल्या काही दिवसंपासून गारवा चांगलाच वाढला असून उबदार कपडे नागरिक परिधान करत आहेत.तसेच शहरी भागात इमातींमधील फरश्या थंडीने गार पडत असल्याने त्यावरून चालण्यासाठी नागरिक पाया मध्ये सॉक्स परिधान करताना दिसून येत आहेत.
सकाळी व रात्री कामा निमित्त बाहेर पडणारा कर्मचारी वर्ग तसेच शहरातील ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा पूर्णपणे उबदार कपड्यांचा वापर करूनच बाहेर पडत आहे तर काही सकाळी सूर्याच्या किरणांमध्ये उभे राहत आहेत.





